लोणंद पालखीतळ पाहणी दरम्यान वॉल कंपाऊंड प्रस्तावावर आक्षेप ; प्रशासनाला काम थांबवण्याचे निर्देश

लोणंद पालखीतळ पाहणी दरम्यान वॉल कंपाऊंड प्रस्तावावर आक्षेप ; प्रशासनाला काम थांबवण्याचे निर्देश

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संस्थान विश्वस्त व सोहळा प्रमुख आज लोणंद पालखी तळाची पाहणी करण्यासाठी आले होते. यासाठी वाई प्रांत, खंडाळा तहसीलदार तसेच लोणंद नगरपंचायत प्रशासन उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते यशवंत दनाने जमीर शेख व सुजित पवार यांनी पालखी सोहळा विश्वस्त यांच्या निदर्शनास आणून दिले की, प्रभाग क्र १४ मधील सर्वे क्र ४/पै मधील क्षेत्र हे कायमस्वरूपी पालखी तळासाठी आरक्षित असून या ठिकाणी नगरपंचायत लोणंद आणि प्रशासन यांच्या माध्यमातून अतिक्रमण करून सदर जागेवर कब्जा मिळवण्याच्या उद्देशाने सर्वानुमते ठराव पास करून त्या ठिकाणी वाल कंपाऊंड व इतर अनुषंगिक कामे करण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून ५० लाख रुपये मंजूर करून घेण्यात आले आहेत.

ही बाब चुकीची व बेकायदेशीर असल्याचे लोणंद नगरपंचायत प्रशासनावर आरोप केले आहेत. पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांवर कायदेशीर अन्याय लोणंद नगरपंचायत करत असल्याचे माननीय विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख आळंदी देवस्थान यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी पालखी सोहळा विश्वस्त व प्रमुख यांनी नगरपंचायत प्रशासनावर तो ताशेरे ओढत सदरचे वॉल कंपाऊंड करू नये बाबत उपविभागीय अधिकारी प्रांत वाई व नगरपंचायत प्रशासन लोणंद यांना आदेश दिले आहेत.

या सर्वे नंबर ४/पै मध्ये सुमारे ४० ते ५० वारकऱ्यांचे तंबू या ठिकाणी पालखी निमित्त येऊन बसतात, यावेळी वॉल कंपाऊंड असल्याकारणाने सदर वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तसेच सदरची जागा ही पालखी संस्थानासाठी आरक्षित असून या ठिकाणी पालखी सोहळ्यानिमित्त येणारे वारकरी तसेच भाविक यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, या वॉल कंपाऊंड मुळे कुठलीही वाहतुकीला, रहदारीला अडचण होता कामा नये. याबाबत पालखी सोहळा विश्वस्तांनी थेट जिल्हाधिकारी महोदयांना गाडीत बसून संपर्क साधून सुचवले .

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालखी सोहळा विश्वस्त व प्रमुखांनी आपल्या मागणीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याकारणाने जाते समय त्यांचे आभार व्यक्त केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर