१ मे रोजी झेंडा फडकवण्याचा एमएसईबी पिंपळनेरला पडला विसर
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याचा पिंपळनेर येथील एमएसईबी कार्यालयाला पडला विसर
साक्री : (प्रतिनिधी विलासराव पाटील)
१मे २०२६ यादिवशी पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे येथील एम एस ई बी कार्यालय, पिंपळनेर सब डिव्हिजन, यांना कामगारांप्रती आदर नसल्यामुळे की काय ?
या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दिनाची व कामगार दिनाची आठवण पडली.
१) श्री.काळे साहेब, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग, पिंपळनेर
२) श्री.नवसारे साहेब , सहाय्यक अभियंता, पिंपळनेर शहर.
आणि
३) श्री.थावरे साहेब, सामोडे कक्ष अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे व कामचुकारपणामुळे राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला नाही.
*आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांच्या संघर्षाचा आणि योगदानाचा दिवस*:
जगभरात दरवर्षी १ मे रोजी कामगार दिन उत्साहात साजरा केला जातो. कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी, ८ तासांच्या कामाच्या वेळेसाठी आणि कामगार चळवळीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. या दिवशी जगभरातील कामगार आपल्या संघर्षाची आठवण ठेवतात आणि भारतासह अनेक देशांत कामगारांना सुट्टी असते.
*कामगार दिनाचा उगम* : कामगार दिनाची सुरुवात १ मे १८८६ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरात झाली. १ मे १८८६ रोजी कामगारांनी दिवसातील कामाचे तास (८ तास) निश्चित करण्यासाठी आंदोलन केले होते, ज्याला ‘हेमार्केट अफेअर’ म्हणून ओळखले जाते. हा दिवस कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, न्याय आणि समाजाच्या उभारणीत त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करतो. हे एक जागतिक आंदोलन आहे जे कामगारांना त्यांच्या सामर्थ्याची आठवण करून देते.
*भारतातील सुरुवात* : भारतात पहिल्यांदा १ मे १९२३ रोजी चेन्नई येथे कामगार दिन साजरा करण्यात आला.
*कामगार दिन व महाराष्ट्र दिन* : महाराष्ट्रात १ मे रोजी कामगार दिनासोबतच ‘महाराष्ट्र दिन’ देखील साजरा केला जातो, कारण १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
*सार्वजनिक सुट्टी* : कामगार दिनानिमित्त बहुतेक सर्वच शासकीय, निमशासकीय, कार्यालये, शाळा आणि बँकांना सार्वजनिक सुट्टी असते.
कामगार दिन हा केवळ सुट्टीचा दिवस नसून तो कामगारांच्या संघर्षाचा आणि कष्टाचा सन्मान करण्याचा दिवस असतो. तसेच महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब म्हणून त्या दिवशीपासून महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला.
*दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी ही दबक्या आवाजात चर्चा*:
सगळ्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील सर्व विभागांमध्ये १ मे रोजी कामगार दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु उपकार्यकारी अभियंता, पिंपळनेर सब डिव्हिजन मध्ये सर्व अधिकारी मात्र झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. येथील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं अजिबातच महत्त्व नसल्यामुळे यांच्या वर कठोर कार्यवाही करण्यात यावी, असे काही कामगारांचे म्हणणे असून आजचा दिवस कामगार दिवस न साजरा केल्यामुळे सर्व कामगारांचा अवमान झाला आहे. आम्ही उपकार्यकारी अभियंता पिंपळनेर सब डिव्हिजन यांचा जाहीर निषेध करत आहोत, असेही त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.










