शनी जयंतीनिमित्त फलटण शहरातील शुक्रवार पेठ, शनिनगर येथील द. य. क्षीरसागर यांच्या खाजगी शनिमंदिरात धार्मिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन

फलटण : शनी जयंतीनिमित्त फलटण शहरातील शुक्रवार पेठ, शनिनगर येथील द. य. क्षीरसागर यांच्या खाजगी शनिमंदिरात धार्मिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक सजावट, भक्तिमय वातावरण आणि दिवसभर सुरू असलेल्या अभिषेक व पूजाविधींमुळे मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता.

 

पहाटे ५ वाजता मंगल स्नान व अभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सामुदायिक अभिषेक पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होत शनिदेवांचे दर्शन घेत पूजाअर्चा केली.

 

दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी शनी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लापशी, जिलेबी, सुंठवडा आणि केळी असा प्रसाद भक्तांना वितरित करण्यात आला.

 

दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत पुन्हा सामुदायिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शनी जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें