आई-वडिलांच्या कष्टाचे झाले फलित कुल्फी विक्रेत्याचा मुलगा झाला पोलीस

आई-वडिलांच्या कष्टाचे झाले फलित कुल्फी विक्रेत्याचा मुलगा झाला पोलीस
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
परिश्रमाला जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाहू न करता आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल,हा विचार करणारे सुद्धा बरेच जण आहेत. आपण ठरवलेले ध्येय गाठायचेच हीच खून गाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या गावोगावी सायकल वर फिरून कुल्फी व फळे विक्रेत्याच्या मुलाला अखेर यश आले असून केंद्रीय राखीव दलाची परीक्षा उत्तीर्ण करून केंद्रीय राखीव पोलीस होत त्याने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे फलित केले आहे.
दत्तात्रय तुळशीराम खोमणे राहणार वाठार बुद्रुक तालुका खंडाळा असे केंद्रीय राखीव पोलीस झालेल्या मुलाचे नाव आहे. वाठार बुद्रुक येथील तुळशीराम बाबुराव खोमणे यांनी पंचक्रोशीतील गावोगावी सायकलवर फिरून कुल्फी आणि ऋतूनुसार फळे यांची विक्री करून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर चार मुली आणि एक मुलगा दत्तात्रय यांचे शिक्षण केले. दत्तात्रय खोमणे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार बुद्रुक तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण वाठार माध्यमिक विद्यालय वाठार बुद्रुक येथे पूर्ण झाले.
सलग सात वर्षे प्रयत्न करूनही थोड्या थोड्या गुणांसाठी अपयशी ठरलेल्या दत्ताने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आठव्या वर्षी अथक प्रयत्नाने यश खेचून आणले. दत्तात्रय खोमणे पोलीस झाल्याची वार्ता गावात पसरतात गावकरी आणि त्याच्या मित्रांनी त्याची भेट घेऊन कौतुक केले. त्याचबरोबर विविध स्तरातून दत्तात्रय याचे कौतुक करण्यात येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें