शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात 8 ते 22 मार्च दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
सातारा दि :
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात दि. ८ ते २२ मार्चअखेर जलमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे असे मा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांनी सांगितले आहे .
या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील गावोगावी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.पाणी ही केवळ पायाभूत सुविधांची बाब राहिलेली नाही तर ती सांस्कृतिक पद्धती म्हणुन पाण्याची जपणूक करावी. पाण्याच्या संवर्धाना साठी स्थानिक पंरपरा यांचा उपयोग मुख्यत : विचारात घेणेत येणार आहेत. गावागावात पाणी तपासणीसाठी महिलांना प्रोत्साहन देणे ,फिल्ड टेस्टिंग किट (FTK) द्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी करणेत येणार आहे.
प्रत्येक गावात युवकांचा जल सवर्धना साठी सहभाग घेणेसाठी यंग बिग्रेडची स्थापना करणेत येणार आहे.
जिल्ह्यातील शाळांमध्ये जलसंवर्धनासाठी स्पर्धाचे आयोजन करणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याच्या सं वर्धानासाठी उपाययोजनांचा समावेश करणेत यावा.
ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. ८ ते २२ मार्च या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार आहे अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुकाअ मा.प्रज्ञा माने भोसले मॅडम यांनी दिली.
गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल. जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असणार आहे.
पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमा मागचा उद्देश आहे असे यावेळी बोलताना ग्रापापु विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी सांगितले .
दि 8 ते 22 मार्च या कालावधीत जलमहोत्सव साजरा केला जाणार आहे. गावात ग्रामसभा घेऊन पाणी पुरवठा योजनाचे जल
अर्पण व जल आंकलन केले जाणार आहे. पाणी व स्वच्छता (vwsc) समितीद्वारे प्रत्यक्ष जलसंवर्धनाच्या कृतीवर भर दिला जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आपल्या गावातील जलस्त्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन वनराई बंधारे, माती बंधारे, CCT, जलतारा व शोषखड्डे इ उपाय योजना करणेत येणार आहेत. जलस्त्रोतांचे पुनरूज्जीवन आणि स्वच्छता करणे, पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण आणि सामुदायिक जल शपथं घेणे असे उपक्रम घेणेत येणार आहेत. ग्रामपंचायत विकास आराखड्यात जलसंवर्धन उपाय योजनांचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे. – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा












