साताऱ्यात उद्या भाजप नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा 

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

मुख्यमंत्री फडणवीस, ना. शिवेंद्रसिंहराजे, ना. गोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे ७ नगराध्यक्ष निवडून आले. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले असून शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२.३० वाजता भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे होणाऱ्या या सोहळ्याला खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात साताराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तरी, या सत्कार समारंभास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal