अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जाचक अटी रद्द करुन आर टी ई प्रवेशात मराठ्यांना न्याय द्या, :- लक्ष्मण शिरसाठ
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
अखिल भारतीय छावा संघटनेचे स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती किल्ले रायगडावर साजरी करण्यात आली जयंतीसाठी राज्यभरातून अण्णासाहेबांवर प्रेम करणारे मराठा बांधव एकत्र जमले होते, यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांनी सांगितले की आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे मराठा असूनही महामंडळाने मराठा तरुणांसाठी वाहन कर्ज तत्काळ सूरु करावे, तसेच पाच लाख उत्पन्न मर्यादेची अट काढून व्याज परतावा कमी वेळेत द्यावा. शिक्षण मंत्री मराठा असूनही आर टी ई प्रवेशात मराठ्यांच्या ६ ते १४ वयोगटातील मुलांना (SEBC) आरक्षणा नुसार किमान १०५८१ मुलांना प्रवेश मिळाला पाहिजे होता परंतु प्रवेश मिळाला फक्त ८९१ मुलांना मिळाला ही खूप मोठी शोकांतिका असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले, अशा आशयाचे निवेदनही संभाजी सेनेच्या वतीने येत्या दोन दिवसांत सरकारला देण्यात येईल. यावेळी किल्ले रायगडावर अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, स्वाभिमानी छावा संघटनेचे रमेश केरे पाटील, मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, भीमराव मराठे, सूर्याजी सोनावले, मच्छिंद्र धनगर, प्रविण (पिंटू) पाटील, आबासाहेब सौंदाणे, विठ्ठलसिंग राजपूत यासह असंख्य मराठा बांधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शेळके पाटील यांनी केले तर आभार पंजाबराव काळे पाटील यांनी मानले.












