गंभीर गुन्हा दाखल होऊनही डॉ विनोद मशाखेत्री यांची निलंबित काळात गोंदिया मुख्यालयात बदली ❓
👉 लंदफंद स्त्रिलंपट विनोदला वाचविण्यासाठी बडवे शशिकांतच्या दरबारात गेले ❓
👉 डॉ. विनोदला बडतर्फ करून त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी..
गडचिरोली, ( चक्रधर मेश्राम) दि. ३० डिसेंबर, २०२५ : – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
डॉ. विनोद यांचेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे नियोजित असल्याने, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मात्र या हरामखोर डॉक्टरच्या बचावात्मक कार्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील काही बडवे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या दरबारात पोहचले होते अशी चर्चा गडचिरोली जिल्हा परिषद परिसरात ऐकावयास मिळत आहे.
निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे असल्याची माहिती
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.. डॉ विनोद हे हैवानासारखे वागुनही बडतर्फ करण्यात आले नाही. यावरून महाराष्ट्र राज्य शासनाचे आरोग्य सेवा संचालनालय किती बेशरम, नालायक आहे याची प्रचिती येते. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला असल्याचे आरोप असुनही डॉ विनोद यांच्या बचावात्मक कार्यासाठी नागपूरच्या दरबारात जाणे. हे सुद्धा बेशिस्तीचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असा प्रकार होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील आजी.. माजी आमदार झोपी गेले आहेत का❓ असा प्रश्नही या घटनेमुळे निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डोंगराळ, नक्षल प्रभावित जिल्ह्यात आरोग्य कंत्राटी कर्मचारी अविरतपणे सेवा देत असतांना महाराष्ट्र राज्य शासनाने अद्याप पर्यंत त्यांना नियमित केले नाही. उलट त्यांचेवर अन्यायच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक घटना समोर आल्या असून समायोजन करून घेण्यासाठी लाखो रुपये जमा केले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबत आरोग्य प्रशासनाने चौकशी करावी.













