सातारा जिल्हा परिषद आरोग्य समिती च्या सदस्य पदी कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची निवड

फलटण प्रतिनिधी. शिवाजी भोसले 

सातारा जिल्हा परिषद आरोग्य समिती च्या सदस्य पदी फलटण पंचायत समिती सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची निवड करण्यात आली. फलटण पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान झाल्यानंतर तरुण, उच्च शिक्षित, तडफदार सर्व समाज घटकांना सामावून घेऊन एवढ्या लहान वयात समाजसेवेची असलेली आवड पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांची सातारा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी नवे उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी, आणि जनतेच्या आरोग्याच्या उन्नतीसाठी मी निश्चितच उत्कृष्ट कार्य करेन अशी त्यांनी ग्वाही दिली.

सातारा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal