“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल

“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल

फलटण प्रतिनीधी :- आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” हे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चांगलेच व्हायरल होत असून सदरच्या स्टेटस ने फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. सदरच्या स्टेटस मुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे विरोधकांच्या बाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी 5 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. तर पाच दिवस सलग आयकर विभागाकडून चौकशी सुरुच होती. काल रात्री आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीची प्रक्रिया संपवली संपवली. 

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, कुरोली फुड्स, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना यासह विविध उद्योगांच्या आर्थिक देवाण-घेवाणीची चौकशी सुरु होती. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काल रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, आयकर विभागास त्यांच्याकडे व गोविंद मिल्क संबंधित असलेल्या चौकशीत काहीही संशयास्पद निष्पन्न झाले नाही.

गेली पाच दिवस श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांचे निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते ठाण मांडून होते. काल रात्री आयकर विभाग यांची चौकशी प्रक्रिया पूर्ण होऊन आयकर विभागाचे पथक निघून गेल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून पेढे वाटून घोषणाबाजी केली.

आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराला श्रीमंत रामराजे यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर”सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” अशा आशयाचे स्टेटस ठेवले. श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल काही वेळात सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले असून नक्की श्रीमंत रामराजे यांचा हा सूचक इशारा कोणाला आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले गेले.

महाराष्ट्राच्या राजकारणात श्रीमंत रामराजे यांना अत्यंत जुने व मुरलेले खेळाडू मानले जाते स्वभावाने शांत पण वेळ आल्यावर राजकीय पटावर वर्चस्व गाजवणारे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. आयकर विभागाच्या चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणारे श्रीमंत रामराजे काल रात्री आयकर विभागाच्या झालेल्या चौकशीनंतर आक्रमक भूमिका घेताना दिसत असून येणाऱ्या काळात राजकीय पलटावर श्रीमंत रामराजे त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा अनुभव पणाला लावून राजकीय भूमिका घेत जशास तसे उत्तर देणार असल्याचे बोलले जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी.