बोरगाव पोलीस ठाणेची कामगिरी,सराईत मोटार सायकल चोर गजाआड
सदर बाबत माहीती अशी की, श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. राजीव नवले उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांनी पोलीस ठाणे हददीतील चोरीचे गुन्हे उगड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
दि. 04/02/2025 रोजी सकाळी 08.00 वा. ते सायं. 6.00 वा. चे दरम्यान ज्ञानेश्वर शंकर निकम रा. अपशिंगे ता. जि. सातारा यांचे मालकीची हिरो एफ. एच डिलक्स मो.सा. क्र.एम.एच.11.सी.एफ. 6885 ही अज्ञात चोरटयाने चोरून नेलेबाबत दिले तक्रारीवरून बोरगाव पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करणेत आलेला होता. त्याअनुषंगाने श्री. डी. एस. वाळवेकर सहा. पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बोरगाव पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना मिळाले गोपनीय माहितीवरून इसम नामे संभाजी बबन जाधव वय.41 वर्षे रा. अतित ता. जि. सातारा यांस अतित गावाचे परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडुन सदर गुन्हातील मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. डी एस वाळवेकर व महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस नाईक प्रशांत चव्हाण पो. ना. दिपककुमार मांडवे, पो. काँ केतन जाधव यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार विजय म्हेत्रे करीत आहेत. ,










