साईनगर लोणजे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न – ३६५ रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :
आमदार अमितजी गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय मायाताई फाउंडेशन व भूषण भाऊ नवगिरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर लोणजे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मंगेशदादा चव्हाण व नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३६५ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये कान-नाक-घसा (ईएनटी) विभागात ५८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुतखड्यासंदर्भात १० रुग्णांना तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तसेच २६ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी करण्यात आली. जनरल तपासणी व हृदयरोग विभागात २२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. याशिवाय इतर सर्वसाधारण आजारांचीही तपासणी करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सेवा दिली. यामध्ये डॉ. कार्तिक तुपे (मेडिसिन), डॉ. रोहित बुक्का (सर्जरी), डॉ. कीर्ती महाजन (नेत्ररोग विभाग), डॉ. प्रथमेश नांदीवाडेकर (कान-नाक-घसा विभाग) आणि डॉ. मुर्तझा सापळावाला (अस्थिरोग विभाग) यांचा समावेश होता. शिबिरात नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध आजारांबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन करून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी साईनगर लोणजे गावचे सरपंच बळीराम उत्तम चव्हाण, प्रशांत नाना देशमुख, संजय भाऊ कापसे, प्रदीप कांबळे यांचे सहकार्य लाभले.













