सातारा जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी ६ नोव्हेंबरला
१७ वर्षांखालील मुले व मुलींना राज्यस्तरीय संघात स्थान मिळविण्याची संधी; जाधववाडीत होणार निवड प्रक्रिया
फलटण (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने १७ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई, जाधववाडी येथे होणार आहे. या निवड चाचणीच्या माध्यमातून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा अधिकृत संघ निवडण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले असून इच्छुक खेळाडूंनी निर्धारित वेळेत स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
निवड चाचणीसंदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी अध्यक्ष वीरभद्र कावडे सर, सुरज ढेंबरे सर (८८०५७७७९९८) किंवा गणेश शिंदे सर (९९२१७३७५४०) यांच्याशी संपर्क साधावा.
सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त होतकरू खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन आपल्या क्रीडागुणांना वाव द्यावा आणि राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













