पोलिस अधिकाऱ्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्या प्रकरणी माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
चाळीसगाव, प्रतिनिधी : किसनराव जोर्वेकर यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ काल दि. 28 जून रोजी जळगाव लोकसभेचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनादरम्यान चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे PSI संदीप घुले यांच्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य केले.
या वेळी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पुसी संदीप घुले यांच्याविषयी शिवीगाळ करून बदनामीकारक अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गोपनीय अंमलदार योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात NC क्र. 613/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 352 व 356(3) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे धरणे आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . पुढील कायदेशीर प्रक्रिया चाळीसगाव शहर पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास चालू आहे.













