पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटून इंधन तुटवड्या विरोधात शिवसेना उ.बा.ठा.चे चाळीसगावत तीव्र आंदोलन
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेल याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून पेरणी नांगरणी आणि शेती मशागतीच्या कामांच्या वेळेसच हा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून इंधन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र रात्र पेट्रोल पंपावर जागून काढावे लागत आहे यामध्ये पेट्रोल पंप चालक व शेतकरी यांच्यामध्ये वाद-विवाद निर्माण होऊन भानगडी देखील होत आहेत त्यातच शासनाने इंधनाच्या दरात चार वेळा दरवाढ करून महागाई देखील केलेली आहे, या सर्व परिस्थितीत शेतकरी होरपळु निघत असून आज तो रडकुंडीला आला असल्याने शेतकऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत व्हावा त्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम सुरळीत व्हावेत यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना करून इंधन पुरवठा उपलब्ध करून द्यावा यासाठी चाळीसगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नागद रोड येथील पेट्रोल पंपावर मेलडी चॉकलेट वाटप करत आंदोलन केले. याच आशयाचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले, देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानांना मेलेडी चॉकलेट देऊन शुभेच्छा देत असून या देशांमध्ये मात्र शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होत असल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून मेलेडी वाटप यावेळी करण्यात आले. या आंदोलनामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, तालुका संघटक सुनील गायकवाड, महेंद्र जयस्वाल, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, सुधाकर मोरे, मोहिनी मगर, रामेश्वर चौधरी, सुनील घोरपडे, आबा पाटील, दिलीप राठोड, दिलीप पाटील, विनायक मांडोळे, जगदीश महाजन, प्रभाकर ओगले, सुभाष राठोड, नाना ठाकरे, बद्री चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, जावेद भाई, राजेंद्र डोके, श्रावण पांचाळ, लक्ष्मण बोराडे, नंदू गायकवाड, संदीप पाटील, गोविंद गवळी, संदीप ठुबे, नाना शिंदे, सुनील मराठे, ऋषिकेश गायकवाड, विलास भोई, गुड्डू पिंजारी, अनिल पाचंगे आदी उपस्थित होते.












