महात्मा फुले गौरव पुरस्काराने अजित जाधव सन्मानित 

महात्मा फुले गौरव पुरस्काराने अजित जाधव सन्मानित 

फलटण : महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्ताने समाजामध्ये विशेष उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सावित्रीबाई सेवा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने समज गौरव व पुरस्कार विचनासमारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले विचार अभियान संयोजक अजित जाधव यांच्या विशेष उल्लेखनीय समाज व देशाच्या हिताचेकार्याबद्दल महात्मा फुले गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

        क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांना मांडवी कोळीवाडा मुंबई येथे महात्मा पदवी अर्पण समारंभाच्या 138 व्या संस्मरणीय दिनी महात्मा फुले यांनी नाना पेठ पुणे येथे शाळा सुरू केली या क्रांती भूमी परिसरामध्ये अहिल्याश्रम पुणे या ठिकाणी सावित्रीबाई सेवा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले.

          डी सी एम सोसायटी जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते अजित जाधव यांना स्मृतिचिन्ह, शाल, संविधान प्रत व महात्मा फुले यांचे पुस्तिका देऊन महात्मा फुले गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला , याप्रसंगी स्वयंसिद्ध राखी रासकर, प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर नेस वाडिया कॉलेज, प्राचार्य डॉ. पौर्णिमा कदम, प्रा. किशोर चौरे धर्मप्रकाश शिंदे सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

            अजित जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केले. सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत सामाजिक विधायक सांस्कृतिक क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये कृतिशील कार्य केले.महात्मा फुले विचार अभियान या विशेष उपक्रमांतर्गत फुले दांपत्याच्या विचाराचा प्रचार प्रसार त्याचबरोबर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या ज्या ठिकाणी उमटल्या त्या ठिकाणी क्रांतिकार्य उजाळा उपक्रमाच्या आयोजन. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे फुले प्रेमींना वितरण केले. फुले दांपत्य यांच्या विचारांचा कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा विशेष गुणगौरव समारंभाचे आयोजन केले.

            कार्यक्रमाकरिता सावित्रीबाई सेवा फौडेशन अध्यक्ष लातंत प्रसून, सचिव हेमा मस्के, लेखिका रश्मी दीक्षित, महादेव शिंदे सामाजिक कार्यकर्ते, वृषभ मस्के उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती अंकेलू सामाजिक कार्यकर्त्यां यांनी केले. कार्यक्रम संयोजक प्रशांत फुले यांनी सर्वांचे आभार मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें