चाळीसगावात स्व. अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नुकतेच विमान अपघातात निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल रविवार दि. 1 रोजी शहरतील वैभव मंगल कार्यालय येथे सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाने राज्यात शोककळा पसरली त्यांच्या स्मरणार्थ शहरातील सर्वपक्षीय शोकसभा घेऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेला शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येत स्व. अजित पवार
यांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेच्या सुरुवातीस उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्व. अजित पवार यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना केली. यावेळी वक्त्यांनी स्व. अजित पवार यांच्या सामाजिक कार्याचा, सर्वसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेतला. स्व. अजित पवार हे नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक सलोखा, आपुलकी आणि सहकार्याची भावना त्यांनी आपल्या कार्यातून जपली होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.













