कविता पालवे दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

कविता पालवे दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तालुक्यातील करंजगाव येथील कविता सूर्यकांत पालवे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘दामिनी राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १५ मार्च रोजी रोटरी क्लब सभागृह, शालिमार, नाशिक येथे पार पडला. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कविता पालवे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आले होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर