लेखापरीक्षक महा अधिवेशन २०२६
ऑडीटर कौन्सिल अँण्ड वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आळंदी येथे दि.२१ व २२ मार्च २०२६ रोजी महा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कौन्सिल चे विस्तव सचिव दत्ताञय पवार, विस्वस्त संजय घोलप, विभागीय अध्यक्ष संपतराव शिंदे, सातारा जिल्हा अध्यक्ष विवेक गायकवाड, उपाध्यक्ष के.डी.पाचुपते, जिल्हा सचिव अरविंद पाटील, अशोक पिसाळ वाई , नारायण सावंत कोरेगाव, संजय पंडित सातारा, मेढा, बाजीराव शिंदे सातारा ,नागेश साळुंखे सातारा ,खंडेराव पाटील कराड,
सुखदेव पवार माण ,संजय चौगुले खटाव, या सर्व पदाधिकारी विश्वस्त यांनी लेखापरीक्षक बंधू- भगिनी यांना सातारा जिल्हातुन जास्तीत जास्त लेखापरिक्षक आळंदी येथे अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन केले , सदर साठी राहण्यासाठी https://mahaauditorscouncil.vdata.in/User/UserRegistration.asps या लिंकवर नोंदणी करावी अशी सूचना करण्यात आली आहे. सातारा जिल्हा अध्यक्ष विवेक गायकवाड यांनी लेखापरिक्षक आळंदी येथे अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन केले.









