साक्री पोस्ट ऑफिस चे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर भरत चौधरी आणि एसपीएम मनोज शिंदे यासह सगळेच कर्मचारी लेट लतीफ.
(साक्री प्रतिनिधी विलासराव पाटील)
साक्री पोस्ट ऑफिस मध्ये आमचे प्रतिनिधी सकाळी नऊ वाजता रजिस्ट्री करण्यासाठी गेले असता तिथे एकही कर्मचारी आढळून आला नाही. तशा तक्रारीही आमच्या प्रतिनिधीला यापूर्वी प्राप्त झालेल्या होत्या.यापूर्वी आमच्या प्रतिनिधीला ही गोष्ट निदर्शनास आलेली होती आणि अशा तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आज सकाळीच आमचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. त्यावेळी तक्रारीत तथ्य आढळून आले. मात्र तेथील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर यांनी बळजबरीने आमच्या प्रतिनिधीला तक्रारदारांचे नाव विचारून दबाव टाकण्याचा असफल प्रयत्न केला. कर्मवीर नगर म्हणजे ही साक्रीतली सेवानिवृत्त शिक्षकांची कॉलनी. सकाळी नऊ पासूनच सूर्य तापायला लागतो म्हणून सकाळीच जाऊन पैसे काढून आणावेत आणि उन्हाचं बाहेर पडावं लागू नये म्हणून ही मंडळी सकाळी साडेआठ वाजेपासूनच पोस्टात गर्दी करतात. मात्र येथील कर्मचारी साडेनऊच्या आधी फिरकतही नाहीत असा त्यांच्या तक्रारीचा सूर होता. त्या शिक्षकांना नाव विचारले असता ते हात जोडून विनंती करतात की, आम्हाला नेहमी त्यांच्याकडे यायचं आहे. आम्ही नावासह जर तक्रार केली तर आम्हाला हे परत सर्विस देतील की नाही किंवा आमचा अपमान करतील अशी आम्हाला भीती असते. म्हणून आम्ही नावासह तक्रारी द्यायला घाबरतो. तुम्ही एका दिवशी येऊन निघून जाणार नंतर काय ? अशी व्यथा पण त्यांनी व्यक्त केली. आम्हाला तर नेहमीच इथे यायचे आहे.

*आणि एसपीएमने रेगुलर कर्मचाऱ्यावरच संताप करणे सुरू केले*…….
एकमेव ट्रेझरी कर्मचारी “सुप्रिया जगताप” या वगळल्या तर सगळेच कर्मचारी मात्र लेट पोहोचले होते. त्या मात्र पावणे नऊ पासूनच पोस्टात हजर होत्या. आमचे कर्मचारी पोस्टातून बाहेर निघत असता तेथील एसपीएम मनोज शिंदे यांनी त्याच जगताप मॅडमला झापणे सुरू केले. की, त्यांना विचारता येत नाही का? कोणाची तक्रार होती त्यांचे नाव विचारायला पाहिजे होते, असे म्हणून त्यांनी त्यांना विचारणा केली. प्रत्यक्षात एसपीएम मनोज शिंदे यांची मुलाखत घेतली असता त्यांनी असा कुठलाही प्रश्न आमच्या प्रतिनिधीला विचारायचे टाळले. आम्ही सेवेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन द्यायलाही ते विसरले नाहीत. मात्र निर्दोष कर्मचाऱ्यांवर त्यांनी संताप करणे सुरू केले.
*आयपीपीबीच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जातोय*……
त्यांच्या दर्शनी भागात काचेवर त्यांच्या ऑफिसची वेळ लिहिलेली आहे. कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते दोन. मात्र तेच कधी नऊ वाजता पोहोचत नाहीत. तसेच दुसऱ्या एका पोस्टरवर पोस्ट ऑफिस ने मोठ्या दिमाखात जाहिरात लिहिलेली आहे.१,३६.०००/_ डाकघरांमध्ये १,९०,०००/_ कर्मचारी आधार एटीएम ने आपल्याला द्वारपोच सेवा देतात. मात्र प्रत्यक्षात पाहता अशी सेवा साक्री तालुक्यात आजपर्यंत कुठेही आढळलेली नाही. द्वारपोच सेवा तर दूरच पण प्रत्यक्षात पोस्टात जाऊन सुद्धा आधार एटीएम ने पैसे मिळत नाहीत. अशा असंख्य तक्रारी यापूर्वी सदर ऑफिसला प्राप्त झालेल्या असून सुद्धा त्यांनी कुठलीही कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही, कामकाजात सुधारणा केली नाही. फक्त साक्रीचेच नाही तर इतर खेड्यापाड्यांवरचे बीपीएम सुद्धा वेळेवर कधीही कार्यालयात येत नाहीत. आणि पूर्ण वेळ कामकाज करत नाहीत. उशिरा येणे, लवकर जाणे, तसेच पूर्णवेळ सेवा न देणे, सतत गैरहजर राहणे, अशा असंख्य तक्रारी यापूर्वी वरिष्ठांना तोंडी आणि लेखी स्वरूपात देऊनसुद्धा याकडे सर्रासपणे डोळेझाक केली जाते. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, साक्री. आणि उपाधीक्षक कार्यालय धुळे यांचे डाकसेवेकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे यावरून लक्षात येते. यापूर्वी धुळे येथील वरिष्ठ कार्यालयाने धाडणे आणि शेणपूर येथे अचानक तपासणी केली असता शेणपूर येथील बीपीएम यांनी टपाल वेळेवर न वाटल्याचे लक्षात आले.त्यावेळेस त्यांना सोबत चौकशीसाठी नेले होते. पण त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांची परत “जैसे थे” तीच परिस्थिती आजही आहे. या सगळ्या प्रसंगांमधून जेष्ठ नागरिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ मिळेल की नाही ? तसेच नियमित आणि वेळेवर सेवा मिळेल की नाही ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
















