मायबाप हो… एकदाच संधी द्या, हे पोरगं तुम्हाला फसवणार नाही


मायबाप हो… एकदाच संधी द्या, हे पोरगं तुम्हाला फसवणार नाही

हा तुमच्या कामाचा आणि फक्त कामाचाच माणूस आहे 

■ संकलन अक्षय धायगुडे नांगरे पाटील 

मायबाप हो.. आपला ऋषी आप्पा ,

आज तुमच्यासमोर उभा असलेला हा तुमचा पोरगा मोठमोठी स्वप्न दाखवायला आलेला नाही. कुठल्या

मोठ्या शब्दांच्या पोकळ घोषणा करायला आलेला नाही. हा कुणाला कमी लेखायला नाही, कुणावर आरोप

करायला नाही, तर एकच साधी, प्रामाणिक मागणी घेऊन

तुमच्यासमोर उभा आहे, “मला बोलण्याची नाही, काम

करायची संधी द्या.” हा पोरगा तुमच्यातलाच आहे.

तुमच्यासारख्याच रस्त्यांवर चाललेला, तुमच्यासारख्याच

अडचणी पाहिलेल्या मातीचा,

प्रश्न समजून घेणाऱ्य ा मनाचा

आणि वेळ पडली की पाठ न फिरवणाऱ्या स्वभावाचा.

गावात एखादा प्रश्न उभा राहिला, एखाद्या घरात संकट

आलं, शेतकऱ्याची कुठ ं फाईल अडली, एखाद्या तरुणाचा कागद थांबला, तेव्हा हा पोरगा “उद्या बघू, नंतर ये” असं कधीच म्हणणारा नाही. तो त्या प्रश्नासोबत उभा राहतो, तो प्रश्न सुटेपर्यंत.

 

मायबाप हो.. आपला ऋषी आप्पा ,

 

तुम्ही त्याला अनुभवातून ओळखता. तो नावापुरता नाही, तो फोटोपुरता नाही, तो निवडणूकपुरता नाही.

निवडणूक नसतानाही तो तुमच्यात होता आणि निवडणूक संपल्यानंतरही तो तुमच्यातच राहणार आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक चेहरे पाहिले. काही प्रचारापुरते आले, काही निवडून गेल्यावर दिसेनासे झाले.

 

पण हा पोरगा तुमच्या सुख-दुःखाचा साक्षीदार राहिला आहे. तुमच्या आनंदात आनंद मानणारा

आणि दुःखात पाठ न फिरवणारा आहे.

 

मायबाप हो…आपला ऋषी आप्पा,

 

सत्ता ही कोणाचीही असो,

 

पण माणूस ‘आपला’ असला पाहिजे.

 

जो फोन उचलतो, जो प्रश्न ऐकतो.

 

आणि तो सुटेपर्यंत सोबत राहतो

 

आज तुम्ही या पोरावर एकदाच विश्वास ठेवा. तो तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही.

 

कारण त्याच्याकडे देण्यासाठी फक्त शब्द नाहीत, तर

 

देण्यासाठी

 

स्वतःला झोकून दिलेलं प्रामाणिक काम आहे. म्हणूनच मायबाप हो,

 

हात जोडून, मनापासून एवढंच सांगायच आहे, एकदाच संधी द्या..!

 

हे पोरगं तुम्हाला कधीच फसवणार नाही. कारण हा तुमच्या कामाचा आणि फक्त कामाचाच माणूस आहे एवढ नक्की सांगतो

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें