पत्रकार दिनानिमित्त चाळीसगाव व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संम्पन्न
(*चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव*):-
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त काल दि. 6 रोजी शहरातील अरिहंत मंगल कार्यालय येथे व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. पत्रकार संघटनात्मक ताकद व लोकशाहीतील भूमिका या विषयावर ज्येष्ठ पत्रकार वक्ते सुरेश उज्जैनवाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर, जेष्ठ पत्रकार नारायण जेठवाणी उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व पत्रकारांनी घेतला यावेळी जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, तालुकाध्यक्ष संतोष भोई, शहराध्यक्ष गफ्फार शेख, तालुका सचिव वैभव वाघ, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र महाले, तालुका संघटक सोजिलाल हाडपे, शहर उपाध्यक्ष रवींद्र कोष्टी, शहर कार्याध्यक्ष रणधीर जाधव, शहर संघटक आनंद गांगुर्डे, सदस्य अजय कोतकर, सुरेश परदेशी, राकेश निकम, रोहित शिंदे, कलीम सय्यद, वाल्मीक गरुड, पत्रकार खुशाल बिडे, खेमचंद कुमावत, योगेश मोरे, किशोर जाधव, योगेश्वर राठोड, प्रशांत गायकवाड, प्रवीण अहिरे, सत्यजीत पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.










