कन्नड घाटात भीषण कार अपघातात शेवगाव येथील तीन तरुण जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-
कन्नड घाटात काल 7 रोजी रात्री झालेल्या कार अपघातात अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तीन जन जागीच मृत्यू झाले तर चार जन जखमी झाले आहे. जखमींवर चाळीसगाव शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शेवगाव येथील सात तरुण कारमधून प्रवास करत होते. ७ जानेवारीच्या रात्री कन्नड घाट परिसरात त्यांची कार आली असता घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटला. परिणामी कार रस्त्यालगत असलेल्या दरीत कोसळली. अपघात इतका भयंकर होता की कारचा अक्षरशा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. तसेच ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७), शेखर रमेश दुरपते (वय ३१), घनशाम रामहरी पिसोटे (वय ३०) सर्व राहणार शेवगाव यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाले तर योगेश तुकाराम सोनवणे (वय २८), अक्षय शिवाजी गिरे (वय २५), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, ) तुषार रमेश घुगे (वय २६) सर्व राहणार शेवगाव हे गँभीर जखमी असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी घाटातील अंधार, तीव्र वळणे आणि वाहनाचा वेग यामुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसून, तपास सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातामुळे शेवगाव परिसरात शोककळा पसरली असून तरुण वयातील तिघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे.













