महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विजय सपकाळे यांची निवड
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
पत्रकारितेचे आद्य जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवशी म्हणजेच पत्रकार दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र मराठी संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना महिला पत्रकार सुनीताताई महाडिक यांच्या हस्ते बॅग वाटप करण्यात आल्या. यावेळी सन 2026-27 ची कार्यकारणी करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश मोरे यांनी विजय सपकाळे यांची नियुक्ती केली, त्यानंतर सपकाळे यांनी योगेश मोरेंसह सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले. याप्रसंगी विजय सपकाळे, आर डी चौधरी, योगेश मोरे यांची समायोजित भाषणे झाली. सदरचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी सुनील शिंपी, किशोर जाधव, योगेश्वर राठोड, जितेंद्र महाले, कैलास सूर्यवंशी, मुस्ताक पिंजारी, सुभाष जाधव, नारायण जेठवाणी, पराग सोनार, रणधीर जाधव, यश पालवे, नीलकंठ साबणे, संजय मिस्तरी, सत्यजित पाटील, जाकिर मिर्झा, खुशाल मोरे, जीवन चव्हाण, गफार मलिक, रोहित शिंदे आदि पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय सपकाळे यांनी सांगितले की संघटनेने माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन व संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करीन व ही संघटना प्रगतीपथावर कशी जाईल यासाठी प्रयत्न करेन.













