पाचगणी पर्यटननगरीत अंमली पदार्थांचा धूर, पोलीसांनी कोकेनसह ४२ लाखाचा मुद्देमाल केला जप्त
सातारा प्रतिनिधी
पाचगणी दि. १७ : सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ११५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडल्याची घटना ताजी असतानाच, आता पाचगणी या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी कोकेनसह तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रात्री उशिरा संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १३ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. कोकेनसह पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका खासगी ठिकाणी काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करण्यासाठी जमल्याची
महागड्या आलिशान गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण ४२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या पार्टीतून पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पाचगणी आणि महाबळेश्वर ही ठिकाणे पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली अशा थंड हवेच्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री आणि सेवन होत असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ सापडले होते, त्यानंतर आता थेट कोकेन सापडल्याने सातारा जिल्ह्याला ड्रग्जचा विळखा बसत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. “जिल्ह्यातील अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सातारा पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे कोणाशी जोडलेले आहेत आणि हे अमली पदार्थ कुठून आले, याचा शोध घेतला जात आहे.” सलग होणाऱ्या य कारवायांमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि जिल्ह्याच्या प्रतिमेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.










