निवडणूक आयोग झोपले.. होते का❓ 👉 निवडणूक रद्द करण्याच्या प्रक्रियेवर संतप्त टिका.  👉निवडणूक आयोग आहे की गोंधळी आयोग ❓

निवडणूक आयोग झोपले.. होते का❓

👉 निवडणूक रद्द करण्याच्या प्रक्रियेवर संतप्त टिका. 

👉निवडणूक आयोग आहे की गोंधळी आयोग ❓

नागपूर ( चक्रधर मेश्राम):- महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती साठी 2 डिसेंबर रोजी मतदान होत असतांना 20 नगरपालिका आणि काही प्रभागातील निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक आणि अकालनिय आहे. हा निर्णय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. असे म्हटले जात असले तरी हा निर्णय 22 नोव्हेंबर रोजी झाला होता. मग 30 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 8 दिवस निवडणूक आयोगाने झोपा काढल्या का❓अशा प्रतिक्रिया उमटत आहेत .निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केल्याने आयोगाच्या सावळ्या गोंधळाची प्रचिती येते. 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायती करिता मतदान झाले आणि एका दिवसापूर्वीच काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणूका आरक्षणाची मर्यादा ओलांडली म्हणून पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन रद्द करण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्याच वर्षांनी घेऊन रद्द करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 24 नगराध्यक्ष आणि 204 नगरसेवकांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. नगरपालिका निवडणुक नियम 1966 , राज्य निवडणूक आयोगाचे 4 नोव्हेंबरचे सहपत्र आणि 29 नोव्हेंबर रोजी आयोगाने दिलेले निर्देश यात समन्वयाचा अभाव आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणूकांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.आयोगाने निर्णय घ्यायचा ते न्यायदेवतेला घ्यावे लागत आहेत. प्रत्येक वेळी त्यांचे कान पिळावे लागत आहेत. किती हा गोंधळ आहे. इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिला नाही. यापूर्वीचे निवडणूक आयोग स्वायत्त असायचे. त्यांच्यात निर्णयक्षमता होती. सत्ताधारीही त्यांच्यापासून सावध असत. आता सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करू लागले आहे. स्वत: निर्णय घेऊ शकत नसल्याने मग प्रत्येक ठिकाणी गोंधळ उडू लागला आहे, 

 राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. उर्वरित ठिकाणी येत्या २० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. २ डिसेंबरच्या मतदानाचा निकाल उद्या, ३ डिसेंबरला जाहीर झाल्यास आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम निश्चित होणार. निवडणूक आयोग साधारणत: अशा परिस्थितीत दोन्ही टप्प्यांचे एकत्र निकाल जाहीर करते. गोंधळलेल्या आयोगाला इतकेही कळाले नाही. आता २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, आज झालेल्या मतदानानंतर जवळपास २० दिवस आता काळजी घ्यावी लागणार आहे. ईव्हीएम छेडछाड होऊ नये यासाठी सजग राहावे लागणार आहे.

शेवटी न्यायालयाचे दार ठोठवावे लागले आणि न्यायदेवतेने निकाल दिला. निवडणूक आयोगाच्या गोंधळाचा नवा अंक अवघ्या महाराष्ट्राने पाहिला,

निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. येथे २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आज आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतील मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत.

सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंबंधी निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, आज मतदान झाले तरी सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी केली जाईल आणि त्यांच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. तर, २० डिसेंबर रोजी मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जातील.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें