कन्नड घाटात प्रवाशांना मारहाण करुन लूटमार करणाऱ्या तीन आरोपींना अटक चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

कन्नड घाटात प्रवाशांना मारहाण करुन लूटमार करणाऱ्या तीन आरोपींना अटक चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई

( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी)
हतनूर हून चाळीसगावच्या दिशेने येत असलेल्या एका प्रवाशाला कन्नड घाटात चाकूने जखमी करून लुटल्याप्रकरणी, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन, तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून हिसकावलेली रोकड, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चाकू जप्त करण्यात आले आहे. दि. २८ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट (वय-२२ वर्ष, रा. हतनूर) हे त्यांचे दोन मित्रांसह मोटारसायकलने हतनूर येथून चाळीसगाव कडे येत असताना, कन्नड घाटात लघुशंकेसाठी थांबले असता, याच वेळी त्यांच्या मोटारसायकलजवळ एक रिक्षा थांबली आणि त्यातून तीन अनोळखी तरुण उतरले, त्यापैकी एका आरोपीच्या हातात चाकू होता. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या साक्षीदारांना, “तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करत आहात?” असे बोलून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे साक्षीदार विशाल केवट हे घाबरून घटनास्थळावरून पळून गेले. हल्ला करणाऱ्या आरोपीने फिर्यादी मंगेश आल्हाट यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केला आणि त्यांच्या खिशातील ६,४००/- रोख रक्कम जबरीने काढून घेतले. याच वेळी इतर दोन आरोपींनी दुसरे साक्षीदार निवृत्ती भडंग यांना लाथा-बुक्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर तिन्ही आरोपी तिथून पळून गेले. घटनेनंतर फिर्यादी मंगेश आल्हाट यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ३७३/२०२५ BNS २०२३ चे कलम ३०९(४), ३०९ (६) व ३११ प्रमाणे जबरी चोरी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तात्काळ तपासासाठी घटनास्थळी
रवाना झाली. सहा. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.उप नि. प्रदिप शेवाळे, स.फौ. युवराज नाईक, पोहवा संदीप माने, पोशि विजय पाटील, पोहवा विकास चव्हाण यांच्यासह स्थागुशा जळगाव येथील पथकाने गोपनीयता ठेवून तपास सुरू केला. कोणताही ठोस दुवा नसताना, केवळ गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी ऋषिकेश कासार याला त्याची रिक्षासह त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी ऋषिकेश कासार याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा त्याचे साथीदार गणेश महेंद्र पवार आणि रमेश उर्फ वाल्मिक सोमनाथ सुपलेकर (रा. चामुंदा माता मंदीरा जवळ, जय बाबजी चौक, चाळीसगाव) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तपासिक अधिकारी यांनी आरोपींकडून फिर्यादीकडील हिसकावलेल्या रकमेपैकी ₹ ४,१००/- रोख रक्कम, साक्षीदाराकडील मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.
पुढील तपास पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उप विभागिय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड तसेच सहा. पोलीस नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे हे करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें