मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव:-
मराठा सेवा संघाच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारिका चव्हाण होत्या. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश अण्णा निकम, सुधीर पुंडलिक पाटील, आर. बी. जगताप, जी. जे. वाघ, सुनील बबनराव देशमुख, अरुण शंकरराव पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष, नगरसेवक दीपक पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. एमपीएससी परीक्षेद्वारे समाज कल्याण अधिकारी म्हणून निवड झालेल्या सुदर्शन चव्हाण यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत ठाकरे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा केवळ सत्कार नसून त्यांच्या भविष्यातील वाटचालीला प्रोत्साहन देणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हर्षल पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), विलास पाटील (राज्य समन्वयक वधू-वर कक्ष), मनोहर सूर्यवंशी, एस. व्ही. पाटील, तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष आरस्ता माळतकर, जयश्री रणदिवे, राजश्री वाघ ,सचिव तमाल देशमुख, किशोर पाटील, निलेश पाटील, सुनील चव्हाण, दर्शन पाटील, प्रकाश साळुंखे, चेतन देशमुख, मीनोति जगताप, संकेत देशमुख, संजय कापसे, बबन पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास बोरसे यांनी केले, तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.












