धुळे शिरपूर तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा गांजा केला जप्त,अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

धुळे शिरपूर तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा गांजा केला जप्त,अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे 

शिरपूर तालुक्यातील जामन्यापाणी गावात वनजमिनीवर मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवून आणणा-या गांजाच्या झाडांची अवैध रित्या लागवड करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई केली असता तेथे 1) कालुसिंग गोंडा पावरा 35 वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश. 2) कृष्णा तारासिंग पावरा 25 वर्ष, गाव सातपाणी, पोस्ट महादेव, तालुका शिरपूर जिल्हा धुळे. 3) हरबा कुवरसिंग पावरा, 27 वर्ष, रागाव तायक्यपाणी, तालुका वराला जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश. 4) गोंडा नाना पावरा, 55 वर्ष, रा धावडा, तालुका वराला, जिल्हा बडवाणी, मध्य प्रदेश. 5) गुलाब हाण्या पावरा, 55 वर्ष, गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे. 6) कांतीलाल गुलाब पावरा 26 वर्ष गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे. 7) रमेश गुलाब पावरा 21 वर्ष गाव जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे वनजमिनीवर सामुहिकरित्या गांजा झाडांची अवैध रित्या लागवड करुन देखभाल व रखवाली करतांना मिळुन आले.

त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापुन व उपटुन त्यांचे प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 21 गठ्ठे बांधुन एकुण 1 हजार 50 किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 20 गठ्ठे बांधुन 1000 किलोग्रॅम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली.गेल्या दोन दिवसात एकुण 1 कोटी 02 लाख 50,000/- रुपये किंमतीचा 2 हजार 50 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें