नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! बससेवेच्या मार्गात मोठा बदल
नाशिक | प्रतिनिधी सचिन देवरे
नाशिक शहरातील बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. निमाणी आणि नाशिक रोड बसस्थानकाच्या कामामुळे सिटीलिंक आणि एसटी बसच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
२१ सप्टेंबरपासून २० डिसेंबरपर्यंत तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीत काही बसफेऱ्या आणि बसथांब्यांचे नियोजन बदलणार आहे.
निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या काही बसफेऱ्या आता मेळा तसेच नवीन सीबीएस–ठक्कर बाजार बसस्थानकातून चालवल्या जाणार आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच्या बसस्थानकावर जाण्यापूर्वी बसचा नवीन मार्ग आणि बस सुटण्याचे ठिकाण तपासणे आवश्यक आहे. अचानक होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे.
AVB न्यूजसाठी प्रतिनिधी — सचिन देवरे, नाशिक
Author: AVB Majha
Post Views: 14












