“कागदावर झाडे, प्रत्यक्षात रस्ते उघडे” झाड लागवड घोटाळा सार्वजनिक निधीचा अपहार उघड

“कागदावर झाडे, प्रत्यक्षात रस्ते उघडे” झाड लागवड घोटाळा सार्वजनिक निधीचा अपहार उघड

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागा कामांतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झाड लागवडीसाठी मंजूर रक्कम अंदाजे ₹ 8,43,720 ते ₹ 9,99,808 एवढी असून, बिलं व मोजमाप पत्रकांमध्ये गंभीर कलमफरेब केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात लागवड न करता, मेंटेनन्स यांसारख्या बाबींचे खोटे दाखले देऊन शासन निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष पाहणी केल्यावरही अनेक ठिकाणी झाडे नसल्याचे दिसून आले. याशिवाय नियमबाह्यरीत्या काशीद व गुलमोहर या प्रजातींचा वापर करून बिलं पास करण्यात आली, ही देखील गंभीर बाब समोर आली आहे. या गंभीर घोटाळ्याविरोधात ने तक्रार दाखल केली असून महासंचालक दिनेश गुप्ता यांच्या आदेशाने ही तक्रार मंत्रालय स्तरावर सचिवांकडे दाखल करण्यात आली आहे. परिणामी, प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्याचे समजते. या प्रकरणात चौकशी केवळ औपचारिक राहू नये, तर ती काटेकोरपणे पुढील बाबींवर केंद्रित असावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही बाब केवळ कंत्राटी गैरव्यवहारापुरती मर्यादित नसून सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे सदर विभागाच्या वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी पारदर्शक, जलदगतीने व निष्कर्षापर्यंत नेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें