निंबोडी गावात रस्त्यावरून येणे जाणेचे कारणावरुन दोन कुटुंबांत हाणामारी – परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल एकुण १७ जणांवर गुन्हे दाखल
खंडाळा तालुक्यातील निंबोडी (पानमळावस्ती) येथे सामायिक रस्त्यावरून ये-जा करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काठ्या-दगडांचा मारा करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलांसह अनेकांना जखमी करून शिवीगाळ व जीव घेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. या प्रकारामुळे १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
याबाबत लोणंद पोलिस स्टेशन वरून मिळालेली अधिक माहिती अशी की लहू आप्पा शेळके वय 50 वर्ष व्यवसाय शेती राहणार निंबोळी पानमळा वस्ती तालुका खंडाळा जिल्हा यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की निंबोडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा गावचे हद्दीत फिर्यादी यांचे घराशेजारील रस्त्यावर 1) बापू सोमा शेळके 2)दादा कांतीलाल शेळके 3)अक्षय बापू शेळके 4)सुहास बापू शेळके 5)नामदेव लक्ष्मण शेळके 6)बबन लक्ष्मण शेळके 7)कांतीलाल लक्ष्मण शेळके 8)संदीप नामदेव शेळके 9)संपत सोमा शेळके 10)रंगनाथ बबन शेळके 11)शोभा बापू शेळके 12)दिपाली दादा शेळके सर्व राहणार निंबोडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांनी फिर्यादी यांची पत्नी वंदना लहू शेळके मुलगा यश वडील आप्पासो आई पारूबाई या सर्वांना सामायिक रस्त्याचे येणे जाण्याचे कारणावरून हातांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तुम्हाला लय मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे म्हणून वगैरे दिलेल्या करून गुन्हा दाखल आहे. तपास पो.हवा. सोनवलकर
. संदिप नामदेव शेळके वय- 45 वर्षे, व्यवसाय शेती, रा. निंबोडी, पानमळावस्ती ता. खंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की निंबोडी, पानमळावस्ती, ता. खंडाळा, जि. सातारा गावचे हद्दीतील रस्त्यावर रस्त्यावरुन येणे-जाणेचे कारणावरुन यातील 1) यश लहु शेळके 2) लहु आप्पा शेळके या दोघांनी कळकाच्या काठीने माझे वडील नामदेव लक्ष्मण शेळके, दादा कांतिलाल शेळके, बापु सोमा शेळके व मला काठीने मारहाण केलेने माझे वडीलांचे पाठीवर काठीचे व्रण उठुन मुक्का मार लागला आहे. तसेच 3) आप्पा कृष्णा शेळके यांनी दगडाने माझे चुलत भाऊ दादा कांतिलाल शेळके व बापु सोमा शेळके यांना व मला मारहाण केलेने त्यामध्ये दादा कांतिलाल शेळके यांचे ओठाला डोक्याला व हाताला दुखापत झाली व माझे उजव्या हाताला मुक्का मार लागला, तसेच 4) वंदना लहु शेळके व 5). पारुबाई आप्पा शेळके यांनी हाताने लाथाबुक्क्यांनी माझी पत्नी राणी व वहीनी दिपाली दादा शेळके, शोभा बापुराव शेळके यांना मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे व तुमच्याकडे बघुन घेतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली आहे या घटनेचा तपास पो हवा टेकवडे हे करीत आहेत.













