अति पावसामुळे पिकांचे नुकसान, भरपाईसाठी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
तालुक्यातील तमगव्हाण परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून दररोज सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी मका बाजरी सर्वच पिकांचे अति पावसामुळे पूर्ण नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी यासाठी 23 रोजी चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पाटील, भारतीय जनता पार्टी सायगाव मंडळाचे सरचिटणीस सुनील पाटील, सरपंच प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गायकवाड, विकास सोसायटी चेअरमन बाजीराव पाटील, अरुण पाटील, भिमराव थोरे, राजेंद्र पाटील, किशोर पाटील, हेमंत पाटील, नचिकेत पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











