जबरी चोरी घरफोडी तडीपार गुन्हेगारास अटक

जबरी चोरी घरफोडी तडीपार गुन्हेगारास अटक

 

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरामध्ये जबरी चोरी, घरफोडी सारखे गुन्हे घडु नये म्हणून मा. पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करणेबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी अंमलदार दि. ११/०९/२०२५ रोजी रात्रौ २२.०० वा. चे सुमारास दत्तनगर, सातारा रोड, हनुमाननगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक पिकअप गाडी सातारा ते फलटण रोडने भरधाव वेगाने वाकडी तिकडी चालवत येत असल्याचे दिसल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यातील चालक नामे निखील ऊर्फ काळू सुरेश जाधव हा फलटण शहरातील सराईत गुन्हेंगार असून त्याचेवर जबरी चोरी घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत त्यास दि.२८/०८/२०२५ रोजी मा.पोलीस अधीक्षक सातारा यांनी दोन वर्षाकरिता सातारा जिल्हयातून तडीपार केले असताना सदरचा आरोपी याने तडीपार आदेशाचा भंग करून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत मिळून आला आहे. त्याचे ताब्यात असलेली पिकअप गाडीबाबत चौकशी केली असता सदरची गाडी त्याने मुंबई शहर येथून चोरून आणल्याचे निष्पन्न झाले म्हणून सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे वर गु.मो.क्र.२९८/२०२५, कलम १४२, १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनयम या प्रमाणे कारवाई करून त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच पनवेल तालुका पोलीस ठाणे गु.नों.क्र.२३९/२०२५ कलम ३१६ (४), ३(५) मधील मधील फसवणूक करून चोरी केलेली पिकअप क्र.एम.एच.४६.सी.यु.७१२३ ही त्याचे ताब्यातून ५,०००००/-रूपये (पाच लाख रूपये ) किंमतीची पिकअप

 

गाडी हस्तगत करण्यात आली आहे.

 

तडीपार आरोपी नामे निखील ऊर्फ काळू सुरेश जाधव रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा याचेवर फलटण शहर पोलीस ठाणेस गु.नों.क्र. (१)११२/२०१६,(२)२११/२०२४, (३)२०३/२०२४,(४)२११/२०२४,(५) २९८/२०२५ अन्वये जबरी चोरी घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल असलेला आरोपी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पकडला आहे.

 

सदरची कामगिरी मा. श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर, अपर अधीक्षक सातारा, मा. श्री विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणेचे मा. श्री हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, श्री दिनेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, बापूराव धायगुडे, अतिश चांदुगडे, निलेश काळुखे, दादासाहेब यादव, पूनम वाघ, राणी फाळके, स्वप्नील खराडे, जितेंद्र टिके, यांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें