वनसडी गावात घरीच बीपी दारू विक्री — पोलिस प्रशासन मूकदर्शक!

वनसडी गावात घरीच बीपी दारू विक्री — पोलिस प्रशासन मूकदर्शक!

कोरपना प्रतिनिधी :मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील वनसडी गावासह मोठ्या प्रमाणात देशी दारू विकल्या जात आहे अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातून कोरपणा मार्गे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक होत असून, हा बेकायदा धंदा पोलिसांच्या नजरेसमोर सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

या अवैध व्यवसायात काही बेरोजगार युवकही गुंतले असल्याचे उघड झाले आहे. युवक पैशाच्या मोहात अडकून हे युवक या धंद्यात उतरल्याने समाजात चुकीचा संदेश पसरत आहे. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा पोलिस प्रशासनास तक्रारी केल्या तरी कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गावात उघडपणे चालणाऱ्या या अवैध दारू व्यवसायामुळे सामाजिक वातावरण बिघडले असून, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या सर्व प्रकारामागे काहींना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा गावभर रंगली आहे. परवानाधारक देशी दारूचे दुकान शासकीय सुट्टी असताना गावातील नाल्याजवळ अवैध व्यावसायिक देशी दारू खुल्याम मोठ्या प्रमाणात विकल्या जातात हे सर्व पोलीस विभागांच्या आशीर्वादानेच सुरु आहे.

प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन यवतमाळ ते कोरपणा मार्गावरील अवैध दारू वाहतुकीवर अंकुश ठेवावा आणि दोषींवर

कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर