फलटणला फक्त दोनच जागा खुल्या ; तब्बल सहा ठिकाणी आरक्षण , नव्यांना मिळणार संधी 

फलटणला फक्त दोनच जागा खुल्या ; तब्बल सहा ठिकाणी आरक्षण , नव्यांना मिळणार संधी 

फलटण प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर फलटणचे तब्बल सहा गट वेगवेगळ्या सवर्गासाठी जाहीर झाले आहेत त्या मुळे फक्त दोनच जागा जिल्हा परिषदेसाठी खुल्या राहिल्या असून कोळकी व हिंगणगाव गटाकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना निंबाळकर व माजी सदस्या ऍड जिजामाला ना निंबाळकर कोणता गट निवडणार हे लक्षवेधी ठरणार आहे 

              आज  पर्यंत झालेल्या निवडणुकी मध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गट आरक्षित झाल्या मुळे इच्छुक असणाऱ्या मातब्बरांची चांगलीच गोची झाली आहे मात्र साखरवाडी व सांगवी  गट नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गा महिला साठी राखीव झाल्याने या दोन गटांना चांगली संधी प्राप्त झाली आहे  कारण पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या दोन गणांपैकी एक फलटणच्या सभापती पदी विराजमान होणार आहे हे निश्चित झाले आहे 

               फलटण जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आरक्षित जागांमुळे नाराज झाले आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांना गट सुद्धा राहिला नाही दोन गट शिल्लक राहिले आहेत त्यात राजे गटाचे नेतृत्व व माजी खासदार गटाचे नेतृत्व उभे राहणार हे निश्चित आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें