साताऱ्यात ईद-ए-मिलाद, गणेशोत्सवासाठी ध्वनीक्षेपकांना सूट

साताऱ्यात ईद-ए-मिलाद, गणेशोत्सवासाठी ध्वनीक्षेपकांना सूट

 

सातारा, दि. 04 सप्टेंबर 2025: ईद-ए-मिलाद (05 सप्टेंबर 2025) आणि गणेशोत्सवातील अनंत चतुर्दशी (06 सप्टेंबर 2025) या सणांसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास तात्पुरती सूट दिली आहे. शासन निर्णय क्रमांक ध्वनी-2009/प्र.क्र.12/08/तां.क.1/2017, दिनांक 05 सप्टेंबर 2016, शासन निर्णय दिनांक 22 ऑगस्ट 2017 आणि केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार, सकाळी 06.00 ते रात्री 12.00 या वेळेत ही परवानगी लागू असेल.

 

ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे अनुपालन बंधनकारक आहे. ध्वनी मर्यादा ओलांडली जाणार नाही, याची जबाबदारी पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी, सातारा यांच्यावर आहे. ही सूट फक्त नमूद तारखांसाठी लागू असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें