गांजासारखा अमली पदार्थ व अग्निशास्त्र गाडीमध्ये ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवणारी टोळी जेरबंद
पोलीस ठाणे :-फलटण ग्रामीण
गुन्हा रजिस्टर नंबर :-616/2025 कलम 8 20 (ब ) (i i)गुगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 बीएनएस नंतर वाढीव केलेले ६१(२),३०३(२)
फिर्यादी :-हनुमंत गुलाब दडस वय 31 वर्ष पोलीस कॉन्स्टेबल 2489 नेमणूक फलटण ग्रामीण
आरोपीचे नाव व पत्ता :-
१.कुमार उर्फ ज्ञानेश्वर मारुती परदेशी राहणार मिरगाव तालुका फलटण जिल्हा सातारा (फरारी)
२.जयेश संपत जाधव वय 23 वर्षे राहणार किकवी तालुका भोर जिल्हा पुणे
३.अनिल सोमनाथ गजरे वय 24 वर्ष राहणार बारवकर नगर कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे
४.ओमकार बापूराव खराडे व 21 वर्षे राहणार बारवकर नगर कांबळेश्वर तालुका बारामती
५. रोहन संतोष एडके वय 24 वर्षे राहणार पटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
६.मुसा शिंदे राहणार बारवकर नगर कांबळेश्वर
७.समीर त्रिंबक पवार राहणार फडतरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा (फरारी )(गांजा व अग्निशत्र ठेवल्यानंतर पोलिसांना खोटी केस करण्यासाठी बातमी देणारा )
अपराधाचे ठिकाण :-मौजे दालवडी फॉरेस्टच्या नजीक नवाळे वस्ती वनखात्याच्या जागेत
अपराध घडला तारीख व वेळ:- 27 ऑगस्ट 2025 चे 15.10 वाजण्यापूर्वीचे
अपराध दाखल तारीख व वेळ:- 27 ऑगस्ट 2025 23.13 वाजता
जप्त मुद्देमाल:- 18 किलो सुका तयार गांजा किंमत ४.३० लाख किंमत
गावठी पिस्तूल मॅक्झिन व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे किंमत १००००
स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 11 सी डब्ल्यू 48 44 ज्या गाडीमध्ये गांजा ठेवण्यात आला होता की किंमत ५ लाख
एकूण जप्त मुद्देमाल किंमत १० लाख
थोडक्यात हकीकत दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना बातमीदाराने माहिती दिली की गाडी क्रमांक एम एच 11 सी डब्ल्यू 48 44 स्विफ्ट डिझायर या गाडीमध्ये गांजा व अग्निशास्त्र आहे व सदरची गाडी रवींद्र कोलवडकर यांची आहे सदरची बातमी प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बदने व तपास पथकाचा स्टाफ हा दालवडी नाळे वस्ती फॉरेस्टच्या जागेत उभ्या असलेल्या वरील क्रमांकाच्या गाडीजवळ गेले व बातमीप्रमाणे त्यांनी रवींद्र कोलवडकर याला घरातून उठून आणून गाडी चेक केली असता वरील प्रमाणे जप्त सुका गांजा व अग्निशास्त्र दोन जिवंत काडतूस सह मिळून आले मिळालेल्या बातमीनुसार व अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या तरतुदीनुसार तात्काळ पोलिसांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला
तपास:-सदर गुन्ह्याचा तपास चालू केला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना वरील गाडी ज्याच्या मालकीची आहे त्या रवींद्र कोलवडकर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याला सदर गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कट केल्याचा प्रथमदर्शनी जबाब दिला सदर जबाबच्या अनुषंगाने त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्यावर समीर त्रिंबक पवार राहणार फडतरवाडी यांनी पोलीस भरती करतो या सदराखाली पैसे मागून फसवल्याबाबत 2022 मध्ये गुन्हा दाखल आहे परंतु सदर गुन्ह्यांमध्ये त्याला जाणीवपूर्वक फसवण्यात आले आहे त्याने समीर त्रंबक फडतरे पवार यांच्याकडून पैसे घेतले होते परंतु ते भरतीसाठी नसून त्याच्या अकॅडमी मध्ये राहण्याची फी घेतली होती असे सांगितले तसेच त्याला कुमार उर्फ ज्ञानेश्वर मारुती परदेशी याने गुन्हा दाखल कार्याला लावले होते असे सांगितले त्याच्या सांगण्यानुसार पोलीस ठाणे अभिलेख तपासला असता पोलीस ठाणे अभिलेखावर गुर क्रमांक. दाखल असल्याचे दिसून आले व त्यामध्ये फिर्यादी समीर पवार हाच असल्याचे दिसून आले सदर फिर्यादीमध्ये जो मोबाईल क्रमांक समीर ने दिला होता त्याच मोबाईल क्रमांकावरून पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना सुद्धा गांजा व पिस्टल रवींद्र कोलवडकर यांच्या गाडीत असल्याबाबतची खबर दिली होती हे निदर्शनास आले नंतर सदर मोबाईल नंबर धारकाचा शोध घेतला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला व तो त्याच्या घरी ही मिळून आला नाही सदरचा मोबाईल क्रमांक हा समीर त्रिंबक पवार याचाच असल्याचे निष्पन्न झाले
तसेच रवींद्र कोलवाडकर यांनी सांगितले की तो पूर्वी कुमार परदेशी यांच्या अकॅडमीमध्ये मुलांना शिकवण्याचे काम करत होता त्यानंतर 2021 मध्ये त्याने स्वतंत्रपणे अकॅडमी वडले या ठिकाणी स्थापन करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर कुमार परदेशी यांचा व्यवसाय कमी झाला होता याचा राग त्यांना होता म्हणून त्यांनी त्याला 2022 मध्ये सुद्धा खोटा फिर्यादी समीर उभा करून अडकवण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्यांनी त्यांना इतरांजवळ व समक्ष त्याने जर अकॅडमी चालवण्याचा धंदा बंद केला नाही तर त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येईल अशी धमकी दिली होती अशा आशयाचा अर्ज रवींद्र कोळकर यांनी माननीय न्यायालयात दाखल केलेला आहे तेही सादर केला वरील प्रमाणे पोलिसांना रवींद्र कोलवडकर यांच्यावर खोटी केस केली याबाबत परिस्थितीजन्य पुरावा दिसल्याने त्यांना अटक न करता त्यांच्याकडे तपास सुरू केला व तांत्रिक विश्लेषण करून यातील आरोपी कुमार उर्फ ज्ञानेश्वर मारुती परदेशी याचा घरी जाऊन शोध घेतला असता काहीही कारण नसताना तो परागंदा झाल्याचे निष्पन्न झाले तसेच तांत्रिक विश्लेषणावरून यामध्ये कुमार परदेशी यांच्या सांगण्यावरून .जयेश संपत जाधव .अनिल सोमनाथ गजरे .ओंकार बापूराव खराडे .रोहन संतोष एडके व इतर अनोळखी इसम व फरारी आरोपी मुसा शिंदे यांनी गाडीमध्ये त्याला खोट्या केस मध्ये अडकवण्यासाठी गांजा व पिस्टल विकत आणून ठेवल्याचे दिसून आल्याने वरील सर्वांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्यांनी कुमार परदेशी यांच्या सांगण्यावरून सदरचे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे या गुन्ह्याच्या प्लॅनिंग साठी ते परदेशी यांच्या मिरगाव येथील अकॅडमी मध्ये पाठीमागील काही दिवसांपासून प्लॅनिंग करत होते त्यासाठी त्यांनी रवींद्र कोलवाडकर यांची रिकी सुद्धा केलेली आहे त्यांना गांजा व पिस्टल हे कुमार परदेशी यांनीच काही हस्तकांपूर्वी पुरवल्याचे सांगितले आहे तसेच रवींद्र कोलवडकर यांची गाडी फॉरेस्ट मध्ये एकटीच उभी असते हे त्यांनी वारंवार देखील करून पाहिले होते व त्यांनीच गुन्ह्याचे आदल्या रात्री सदर गाडी बनावट चावी ने उघडून सदर गाडीतली स्टेपनी काढून त्या जागी पिशवीमध्ये गांजा व सीटवरही गांजा दोन पुडे तसेच कापडामध्ये गुंडाळलेले पिस्टल व दोन राउंड ठेवल्याची कबुली दिलेली आहे वरील सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये आणखी काही अनोखी आहेत त्यांचाही शोध सुरू आहे
सदर गुन्ह्याच्या एकंदरीतपासावरून रवींद्र नामदेव कोलोडकर यांच्याबरोबर कुमार उर्फ ज्ञानेश्वर मारुती परदेशी यांचा अकॅडमीच्या व्यवसायाच्या स्पर्धेचे वाद असल्याने व रवींद्र कोलवडकर यांची अकादमी तो बंद करत नाही म्हणून कुमार परदेशी यांनी त्याच्या गाडीमध्ये अमली पदार्थ गांजा व पिस्टल इतर आरोपी बरोबर कट कारस्थान करून ठेवल्याचे निष्पन्न झालेले आहे व यातूनच त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची प्रयत्न झालेले आहेत या गुन्ह्याला अमली पदार्थ कायदा तसेच पिस्टल साठी अग्निशास्त्र कायदा तसेच सदर कोलवडकर यांच्या गाडीचे स्टेफनी चोरून त्या जागी आपले पदार्थ ठेवले यासाठी स्टेफनी चोरीचा गुन्हा व या सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांनी सर्वांनी नियोजनबद्ध गुन्हेगारी कट केला याबद्दलचे कलम लावून कलम वाढ केलेली आहे अटक आरोपींना माननीय वाघ न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे सरकारी वकील बाबर यांनी पोलीस ची बाजू मांडली आहे त्यांच्याकडे तपास केलेला आहे यामध्ये आणखीही आरोपी निष्पन्न होणार आहेत यापुढे हनी ट्रॅप सारख्या घटना तसेच आमले पदार्थ ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासारख्या गंभीर घटना करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी ह्या पूर्वी फलटण ग्रामीण पोलीस ने फिर्यादी नाव गुप्त ठेवून हनी ट्रैप रैकेट उघड केले होते त्यात गुन्हेगारी रेकॉर्ड वरील आरोपी होते यात ही गुन्हेगारी रेकॉर्ड आरोपीचा वापर झाला आहे अनिल गाजरे हा हनी ट्रैप मधे सुद्धा होता तेनवा पासून फरारी होता सदर गुन्ह्याचा तपास सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडू कर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी नितीन चतुरे तात्या कदम हनुमंत दडस पोलीस नाईक अमोल जगदाळे पोलीस शिपाई तुषार नलावडे रंगवाड काशीद हे करत आहेत.













