सलग पाचव्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांनी घडवली चाळीसगाव तालुक्यातील वारकऱ्यांना पंढरपूर वारी

सलग पाचव्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांनी घडवली चाळीसगाव तालुक्यातील वारकऱ्यांना पंढरपूर वारी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
काल शनिवार दि.१२ जुलै रोजी चाळीसगाव तालुक्यातून सुमारे ३१०० वारकरी विशेष मोफत ट्रेनने पंढरपूर वारी साठी निघाले. सलग पाचव्या वर्षी ही वारी आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून यंदाही यशस्वीपणे आयोजित होत आहे. दि.१२ रोजी रात्री ९ वाजता चाळीसगाव स्थानकावरून रेल्वेने निघालेल्या भक्तांच्या या यात्रेला जय हरी विठलच्या जय घोषाने वारकरी उत्साही वातावरण दिसले. विशेष बाब म्हणजे आमदार मंगेश चव्हाण हे स्वतः देखील या वारीत उत्साहिपणे सहभागी होऊन वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
वारीच्या संपूर्ण प्रवासात – चाळीसगाव ते पंढरपूर -पंढरपूर ते चाळीसगाव वारकऱ्यांसाठी जेवण, राहण्याची व्यवस्था आणि आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन आमदार चव्हाण यांनी केले आहे. हजारो वारकऱ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखीसोबत विठू माऊलीच्या गजरात रेल्वे स्टेशन कडे जात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी भाविक विशेष ट्रेनने रवाना झाले. यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी देखील हजेरी लावली. चाळीसगाव परिसरातील नागरिकांमध्ये आमदार चव्हाण यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, त्यांच्या सामाजिक सहभागाचे पुन्हा एकदा उदाहरण समोर आले आहे.

*लोकांचा आमदार चव्हाण यांच्या साठी लाल दिव्याचा आग्रह*
आम्ही किती टर्म लढणार आहोत आता पुढे वारस हेच आहे जिल्ह्याला, तुम्ही काळजी करू नका, नेतृत्व तरुणांकडेच जाणार आहे आणि एक चांगला नेता, उत्कृष्ट नेता, दिलदार नेता तुम्हाला मिळाला आहे असे मी नाही महाराष्ट्र म्हणतो आमचे नेते म्हणतात. :- मंत्री गिरीश महाजन

*गिरीश भाऊ कडे हट्ट केला की ते लगेच पूर्ण करतात*
एखाद्या वारकऱ्यांने विठ्ठलाकडे हट्ट करावा आणि विठ्ठलाने तो पुरवावा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे, तसंच माझं थोडस काही आहे, की मी गिरीश भाऊंकडे हट्ट करावा आणि त्यांनी नाही म्हणावे असे कधी झाले नाही
-: आमदार मंगेश चव्हाण

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें