पवार साहेबांची राष्ट्रवादी फलटणच्या निवडणुका ताकदीने लढवणार पक्ष संघटना पुन्हा नव्याने बांधली जाणार : राजाभाऊ निकम
फलटण प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या फलटण तालुक्यामध्ये संपूर्ण ताकदीने लढवणार आहे .त्याबाबत येणाऱ्या काही दिवसात राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा फलटणमध्ये संपन्न होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष संघटना ही फलटण तालुक्यात पुन्हा नव्याने बांधली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी दिली आहे .
Author: AVB Majha
Post Views: 298









