महावितरणच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी सेनेचे रस्ता रोको आंदोलन

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी सेनेचे रस्ता रोको आंदोलन

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-

महावितरण कंपनीचे ठेकेदार यांनी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कुठलीही पूर्वसूचनान देता कामावरून काढून टाकल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संभाजी सेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून संबंधित कार्यालयांना दहा ते बारा दिवस अगोदरच निवेदन दिले होते, त्यानुसार दि. १९ मे रोजी महाराष्ट्र वीज वितरण कार्यालया समोरील हिरापूर रोड वर संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, दरम्यान कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांनी सदर ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्याचा प्रस्ताव पाठवला असून सदर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली, त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले परंतु येत्या पंधरा दिवसात जर सदर बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेतले नाही तर लेखी आश्वासन देणाऱ्या कार्यकारी अभियंता नितीन घुमरे यांची संभाजी सेना आरती उतरविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला, आंदोलनावेळी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शहराध्यक्ष आबासाहेब सौंदाणे, उद्योग रोजगार आघाडीचे अविनाश काकडे, शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, विभाग प्रमुख संदीप जाधव, मुंबई संपर्कप्रमुख विठ्ठल सिंग राजपूत, प्रदेश संघटक सुनील पाटील, तालुका प्रवक्ता दिवाकर महाले, शाहिद पिंजारी, महेंद्रसिंग पाटील, छोटू पाटील, विनोद पाटील, सुनील महाले, योगेश पाटील, रमेश राठोड, प्रकाश पाटील, राहुल सोनवणे, जितेंद्र गायकवाड, लक्ष्मण बनकर यांच्यासह संभाजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें