पत्रकार महेंद्र सुर्यवंशी हे शहीद भगतसिंग पुरस्काराने सन्मानित
चाळीसगाव प्रतिनिधी :-चाळीसगाव येथील पत्रकार महेंद्र सुर्यवंशी यांना त्यांच्या निर्भीड आणि धडाकेबाज पत्रकारितेसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती आणि ब्रिज ह्यूमन राइट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते शहीद भगतसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला राजवडचे सरपंच भगवान आसाराम महाजन, अरुण देशमुख, पुष्पलता निळकंठ पाटील, स्वागताध्यक्ष ॲड. राणीताई स्वामी (महिला प्रदेशाध्यक्षा), सोनलताई पाटील (महिला जिल्हाध्यक्षा, जळगाव), सनाताई शेख (युवती प्रदेशाध्यक्षा), निर्मलाताई बुल्हे, सारिकाताई नागरे (महिला प्रदेश सरचिटणीस) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव पत्रकार महेंद्र सुर्यवंशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली आहे. त्यांच्या निर्भीड आणि धडाकेबाज पत्रकारितेमुळे अनेक अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळाला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना शहीद भगतसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराचे महत्त्व
शहीद भगतसिंग हे स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे, असे मत पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकार महेंद्र सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.













