अचिवर्स पब्लिक स्कुल मध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन
चाळीसगाव प्रतिनिधी :-
अचिवर्स पब्लिक स्कुलचे स्नेहसंमेलन नुकतेच शाळेच्या प्रांगणात पार पडले. यात गीत नृत्य व नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलातरंग सादरीकरण केले. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष शरद पाटील सचिव पल्लवी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनातं विद्यार्थ्यांनी अफजल खानाचा वध, हिंदू मुस्लिम एकता, राष्ट्रीय एकात्मता शेती व शेतकरी संसार संस्कृती मराठी हिंदी चित्रपट गिते आदी विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले, कार्यक्रमात तीनशे हुन अधिक विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमासाठी अचिवर्स पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, या स्नेह संमेलनाला मोहसीन सर, मतीन सर व सागर सर यांचे मार्गदर्शन लाभले.













