आंदोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कैलास भिसे यांची निवड

आंदोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कैलास भिसे यांची निवड

खंडाळा प्रतिनिधी:

आंदोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ग्रामपंचायत ची उपसरपंच पदाची निवड खंडाळा पंचायत समितीचे प्रकाश बोंबले साहेब याच्या उपस्थितीत पार पडली 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास भिसे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बोंबले यांनी कैलास भिसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड केली

यानिवडी वेळी आंदोरी गावचे विद्यमान सरपंच किसन(बापू) ननावरे 

    सदस्य बाळासाहेब होवाळ. नामदेव नरुटे, सुचेता हाडंबर ,सुप्रिया धायगुडे , समाजिक कार्यकर्ते शामराव धायगुडे, काशिनाथ धायगुडे, अशोक धायगुडे , नवनाथ ससाने, विश्वास डॉ आण्णा हाडंबर ह. भ. कुंडलिक दगडे महाराज. वदंना भिसे (माजी सरपंच),सुरेश नरुटे, मोहन धायगुडे, उत्तम भिसे या सर्वांची उपस्थिती होती.

कैलास भिसे हे लहुजी शक्ती सेनेचे खंडाळा तालुकाप्रमुख असून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा संपूर्ण खंडाळा तालुक्यामध्ये उठवला आहे यामुळे विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें