श्रीदत्त इंडिया ३१०० रुपये पहिली उचल देणार-अजितराव जगताप

 फलटण प्रतिनिधी:

साखरवाडी ता फलटण येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४/२५ साठी गाळफास येणाऱ्या उसाला पहिली उचल म्हणून ३१०० रुपये प्रति टन दर जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली कारखाना कार्य स्थळावरील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला यावेळी अजितराव जगताप म्हणाले की,

आमच्या श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा एफआरपी नुसार दर हा २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे मात्र जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दिलेला दर व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी याचा सकारात्मक विचार करून आमचा कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती श्री दत्त इंडिया कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली मागील चार हंगामामध्ये श्री दत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्यामध्ये कधीही कमी पडला नसून भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना अधिका अधिक दर देण्याचा आमच्या कारखान्याचा प्रयत्न राहणार असून फलटण तालुक्यासह तालुक्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला गाळपास देण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी व्हॉइस प्रेसिडेंट भारत तावरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, दिगंबर माने, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल,  अकाउंट जनरल मॅनेजर अमोल शिंदे, चीप इंजिनिअर अजित कदम, फलटण तालुका साखर कामगार सेक्रेटरी राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले पै संतोष भोसले गोरख, भोसले सुहास गायकवाड, पोपट भोसले,संजय जाधव उपस्थित होते

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal