श्री संत मुक्ताई पालखीचे चाळीसगाव येथील विठ्ठल मंदिरात भव्य स्वागत
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव ) :-
मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथून दिनांक 28 डिसेंबर रोजी निघालेल्या श्री संत आधी शक्ती मुक्ताई पालखीचे आज चाळीसगाव शहरातील विठ्ठल मंदिर फाडी येथे सकाळी 9 वाजता गांधी चौक मित्र मंडळ परिवारातर्फे भव्य स्वागत करण्यात आले, यावेळी पालखीतील प्रमुख मान्यवरांचे स्वागत पालखीचे स्वागत मानकरी शैलेश ठाकूर व श्याम रोकडे यांनी केले. तसेच पालखीतील इतर सदस्यांचे देखील गांधी चौक मित्रपरिवार तर्फे सत्कार करण्यात आले, पालखीतील सदस्यांना अल्पोहार, चहाची व्यवस्था करण्यात आली होती, श्री संत मुक्ताई पालखीचे यंदाचे हे 68 वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचे चाळीसगाव शहरात भव्य स्वागत करण्यात आले, दिनांक 28 डिसेंबर रोजी निघालेल्या या पालखीचे त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 24 जानेवारी रोजी प्रस्थान होणार आहे. यावेळी नीळकंठ साळुंखे, सचिन चौधरी, शुभम देशमुख, रोहित वाणी, गणेश देशमुख, यांच्यासह महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.













