जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव : –
दगडी बँक म्हणून नावलौकिक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दि. 30 रोजी चाळीसगाव सोसायटी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम, जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, दूध संघाचे संचालक मधुकर राणे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधतांनाना म्हणाले की आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महायुती पॅनलबाबत प्राथमिक चर्चा सुरु असून या संदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात आणि महायुतीच्या पॅनलबाबत काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें