🚆 नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!
नाशिकच्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
देवळाली ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या ‘शेतकरी समृद्धी’ अनारक्षित विशेष रेल्वे सेवेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही रेल्वे सेवा आता 12 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे.
कांदा, द्राक्षे, डाळिंब, आले यांसह विविध कृषी मालाची वाहतूक या रेल्वेमधून केली जात आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत या रेल्वेने 14 हजार टनांहून अधिक पार्सल मालाची वाहतूक केली असून, शेतकऱ्यांना दूरच्या बाजारपेठांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरत आहे.
त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
नाशिक प्रतिनिधी सचिन देवरे.
Author: AVB Majha
Post Views: 12












