स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! फलटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण पदाची सोडत दि. 2 जानेवारी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार!

फलटण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण पदाची सोडत दि. 2 जानेवारी होणार

फलटण प्रतिनिधी:
दोन वर्षाहून अधिक कालावधीपासून राज्यातील ग्रामपंचायंतीवंर प्रशासक नेमलेला आहे त्याचप्रमाणे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका, यांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने प्रशासक नेमला गेला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत या निवडणुका नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता होण्याची शक्यता आहे .लोकसभा, विधानसभा, यांच्या निवडणुका संपल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले गेले आहे
काही ग्रामपंचायतींच्या कार्यकाल लोकसभा लागण्यापूर्वीच संपला होता यावरती शासनाने प्रशासक नेमले होते.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दिनांक 1 जानेवारी 2024 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण पदाची सोडत दिनांक 2 जाने.2025 या दिवशी दुपारी तीन वाजता पंचायत समिती कार्यालय फलटण या ठिकाणी होणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.
यामध्ये एकूण 22 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत होणार आहे. यामध्ये तरडगाव, विठ्ठलवाडी, खडकी, मिरगाव, गोखळी, खटकेवस्ती, माळेवाडी, शिंदेमाळ, चांभारवाडी, मिरेवाडी (दालवडी), दालवडी, आसू, ढवळेवाडी (आसू), सासवड, टाकुबाईचीवाडी, उलुंब, जोर (वाखरी ) जोर कुरवली खुर्द, परहर खुर्द,गोळेवाडी, गोळेगाव,माझेरी या ग्रामपंचायतीचा समावेशअसणार आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें