कर्नाटक राज्यातून आणलेला १०,३०,०००/- रूपयाचा गुटखा तासवडे टोलनाका येथे बोलेरो पिकअप टेम्पोसह तळबीड पोलीसांनी पकडला.#

कर्नाटक राज्यातून आणलेला १०,३०,०००/- रूपयाचा गुटखा तासवडे टोलनाका येथे बोलेरो पिकअप टेम्पोसह तळबीड पोलीसांनी पकडला.

सातारा प्रतिनिधी:

दि २१/१२/२०२४ रोजी रात्रौ २३.३० वा चे सुमारास निपाणी कर्नाटक येथून एक पांढरे रंगाचा बोलेरो पिकअप हौदा टेम्पो त्यावर समोरील बाजूस विठ्ठल साई असे लिहलेला पिकअप टेम्पो गुटखा घेवून जाणार आहे असे तळबीड पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी किरण भोसले सो यांना त्याचे खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यानी लागलीच तळबीड पोलीस ठाण्या कडील टीमला तात्काळ सूचना देवून तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी लावून वॉच करीत असता कराड कडून टोलनाक्याकडे मिळाले बातमी प्रमाणे बोलेरो पिकअप हौदा टेम्पो ज्यावर विठ्ठल साई असे मोठ्या अक्षरात लिहले असलेला येत असलेला पाहून पिकअप टेम्पोला थांबवून ड्रायव्हर यांस नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव विकास वसंत जाधव वय ३५ वर्षे रा. गणेश चौक कोडोली सातारा असे सांगितल्याने गुटख्याचा व गाडीचा सविस्तर पंचनामा केला असून एकूण १०,३०,०००/-रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून टेम्पो व प्लॅस्टीकच्या क्रेट सहित एकूण १५,४१,०३०/- वर्णनाचा मुद्देमाल ताब्यात घेणेत आला आहे. व त्याचेवर तळबीड पोलीस ठाणेस नौद करण्यात आला आहे. गुन्हा

 

सदर कारवाई कामी मा. पोलीस अधिक्षक मा. श्री समीर शेख साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती.कडूकर मॅडम, कराड उप विभागीय अधिकारी श्री. अमोल ठाकूर साहेब याचे मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले साहेब, चालक मोरे, सपोफौ खराडे, पोहवा सांळुखे, पो.हवा. शहाजी पाटील पो कॉ सुशांत कुंभार, प्रविण गायकवाड, अभय मोरे, गणेश राठोड, निलेश विभूते, मपोका रत्ना कुंभार यांच्या पथकाने कामगिरी केली आहे. अटक आरोपी विकास जाधव यास दि. २६/१२/२०२४ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील तपास सपोनि किरण भोसले करीत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें